नागरिकांना आवाहन



आपल्या शहराबद्दल प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे विचार करण्यासाठी आणि काही ठोस उपाययोजना आखण्यासाठी हा वाद-संवाद एक प्रभावी व्यासपीठ ठरू शकेल.

म्हणूनच, पुण्याचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला या वाद-संवादामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो. पुणेकरांना आपल्या शहराच्या पर्यावरणाविषयी आणि पर्यावरण अहवाल कसा तयार व्हावा याविषयी जे वाटतं ते थेट पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांपर्यंत पोचवण्याची ही उत्तम संधी आहे. 

आपल्या शहराबद्दल प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे विचार करण्याचे आणि काही ठोस उपाययोजना आखण्याचे हे एक प्रभावी व्यासपीठही ठरू शकेल.

मी या उपक्रमामध्ये नक्कीच सहभागी होणार आहे.
तुम्ही ही व्हाल असा विश्वास आहे.

तुम्ही या उपक्रमात कशाप्रकारे सहभागी होऊ इच्छिता? इथे कळवा

या वादसंवादाची तयारी म्हणून बरीच कामे करण्यासारखी आहेत.


·         या उपक्रमाबद्दल लोकांना सांगा
हा उपक्रम खऱ्याअर्थाने लोकसहभागातून व्हायला हवा. तुमची मित्र-मंडळी, परिचित, कुटुंबीय आणि समविचारी व्यक्तींना या वाद-संवादाविषयी माहिती द्या.
·         हा वादविवाद आयोजित करायला मदत करा
या वादसंवादाच्या आयोजनादरम्यान बरीच छोटी-मोठी कामे डोकी वर काढणार आहेत. ती मार्गी लावण्यामध्ये हातभार लावा.
·         या अहवालाचा अभ्यास करा
नागरिकांच्या वतीने जो गट प्रश्न विचारणार आहे, या वाद-संवादात प्रत्यक्ष सहभागी होणार आहे, त्या गटाला मुद्दे सुचवा.
·         प्रत्यक्ष वाद-संवादात सहभागी व्हा
जेव्हा वाद-संवाद होईल तेव्हा प्रत्यक्ष हजर राहून चर्चेत सहभागी व्हा व प्रश्न विचारा. तसे करण्यासाठी तुमचे प्रश्न अगोदरच आयोजकांना पाठवा.
·         या वादसंवादाचा लिखित दस्तऐवज तयार करायला मदत करा
आपल्याला या वाद-संवादातून मान्य झालेल्या, नवीन सुचलेल्या कल्पना यांचा व्यवस्थित लेखाजोखा मांडायला हवा. यावर दोन्ही पक्षांची स्वाक्षरी असेल. हा लेखाजोखा पुढच्या वर्षीचा अहवाल बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
·         या उपक्रमासाठी देणगी द्या अथवा देणगी गोळा करण्यासाठी मदत करा
हा वाद-संवाद नागरिकांनी, नागरिकांसाठी आयोजित केला असल्याने याचा खर्च आपला आपण उभा करायचा आहे. यासाठी तुम्ही काही निधी उभा करावा आणि या वादसंवादाच्या आयोजनामध्ये हातभार लावावा.




No comments:

Post a Comment