महानगरपालिकेने नागरिकांच्या वतीने बनविलेल्या अहवालावर जर
नागरिकांनाच प्रश्न अथवा तक्रारी असतील तर त्यांचे निवारणकरण्यासाठी जसे लोकप्रतिनिधी
नागरिकांना उत्तरदायी आहेत, तसेच प्रशासनही उत्तरदायी आहे. लोकशाहीत जनतेच्या
आवाजाला फक्त मतदानाच्या दिवशीच महत्व असते हे आम्ही मान्य करत नाही. याच
संविधानिक हक्काचा वापर करुन हा वाद-संवाद साकार होणार आहे.
ही चर्चा केवळ वादासाठी नाही, तर सुधारणेसाठी आहे. या
संवादातून पर्यावरण अहवाल तयार करण्याची प्रक्रिया, नागरिकांचा सहभाग, अहवालाची विश्वासार्हता, अहवालाचा शहर
विकासावर होणारा परिणाम, अहवालाचे महत्व व त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद या सर्व
मुद्द्यांवर रोखठोक सुधारणा सुचवण्यात येतील.
No comments:
Post a Comment