पार्श्वभूमी



पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधून, पुणे शहराचे व पर्यायाचे तुमचे व माझे भले करण्याची एका उत्तम संधी विषयी सांगण्यासाठी हे पत्र. 

पुणे महानगरपालिकेने ‘पुणे शहराचा पर्यावरण अहवाल’ ५ सप्टेंबर २०१२ रोजी मंजूर केला.

पर्यावरण अहवालात शहराच्या पर्यावरणाविषयी थेट आणि पारदर्शी भाष्य अपेक्षित असते. पुणे पर्यावरण अहवाल २०११-१२ मात्र शहराविषयी एक काल्पनिक चित्र रंगवतो. ह्या अहवालाने नागरिकांपासून सत्य गोष्टी लपवून ठवल्या आहेत असे आम्हाला वाटते. हे कसे, ते पाहण्यासाठी अभिषेक वाघमारेने लिहिलेला लेख आपण वाचू शकता.

हा अहवाल आहे तसा मान्य करणे म्हणजे आपण “पुण्याचे पर्यावरण हे अतिशय आरोग्यदायी, सुरक्षित आणि काळजी घेतले गेलेले आहे” हे विधान जाहीरपणे मान्य करण्यासारखे आहे. पुण्याची परिस्थिती पाहता, एक जागरूक पुणेकर म्हणून मी हे विधान स्वीकारू शकत नाही.

अतिरिक्त आयुक्त श्री. नरेश झुरमुरे हा अहवाल बनवण्यामध्ये सहभागी झाले होते. काही नागरिकांनी आपली या अहवालाविषयीची चिंता श्री. झुरमुरे यांच्या समोर व्यक्त केली. तेव्हा असे ठरवण्यात आले की नागरिक आणि पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांमध्ये या अहवालाविषयी असलेले मतभेद एका जाहीर वाद-संवादाद्वारे सोडवले जावेत.

अतिरिक्त आयुक्त श्री. नरेश झुरमुरे यांनी असे आश्वासन दिले आहे की या वादा-संवादातून समोर येणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे नवा पर्यावरण अहवाल बनवण्यात येईल.

No comments:

Post a Comment